तलासरीत वृद्धेची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

तलासरी (मुंबई) - मौजे सूत्रकार गोवरशेतपाडा येथे वृद्ध महिलेची हत्या करून मृतदेह फरफटत रस्त्यावर फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. लखमी माहदया धोदडे (वय 60) असे मृत महिलेचे नाव आहे. ती सूत्रकार काटीलपाडा येथील रहिवासी होती. तलासरी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लक्षी रिश्‍या खरपडे याला अटक करण्यात आली आहे. खरपडे याने सोमवारी मध्यरात्री दारूच्या नशेत जिल्हा परिषदेच्या शाळेच्या व्हरांड्यात झोपलेल्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
Web Title: talasari mumbai news old women murder