तलासरीत एक कोटीचा अवैध खैरसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

तलासरी - डहाणू तालुक्‍यातील दापचरी गावातील एका शेतात वन विभागाने खैराचा सुमारे एक कोटी रुपयांचा अवैध साठा जप्त केला आहे.

तलासरी - डहाणू तालुक्‍यातील दापचरी गावातील एका शेतात वन विभागाने खैराचा सुमारे एक कोटी रुपयांचा अवैध साठा जप्त केला आहे.

सहायक वनसंरक्षक वर्षा वरकुटे यांच्या पथकाने दापचरी येथील गोरखनपाडा येथे छापा घालून अंदाजे 60 ते 70 टन खैराचे लाकूड जप्त केले. त्यानंतर चार डम्पर व चार टेम्पोमधून उधवा वन विभागाच्या कार्यालयाजवळ लाकूड जमा करण्यात आले आहे. या प्रकरणी उधवा वनक्षेत्रात विष्णू सुतार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन महिन्यांपूर्वीच दापचरी दुग्ध प्रकल्पात 40 कोटींचे अमली पदार्थ सापडले होते. त्यानंतर पुन्हा गोरखनपाडा येथे एक कोटी रुपयांचा खैराचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात गुन्हेगारी कारवाया वाढल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

Web Title: talasari mumbai news one crore rupees khair wood seized