esakal | तळीये : गावकऱ्यांनी सदनिकेत सुचवले बदल
sakal

बोलून बातमी शोधा

taliye

तळीये : गावकऱ्यांनी सदनिकेत सुचवले बदल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अतिवृष्टीमुळे दरड कोसळून रायगड जिल्ह्यातील तळीये गाव व आजूबाजूच्या वाड्यांमधील घरे उद्ध्वस्त झाली, यात मोठी जीवित व वित्त हानी झाली. या दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांना ‘म्हाडा’मार्फत घरे उभारून देण्यात येणार असून या घरांच्या प्रतिकृती म्हाडा कार्यालयात उभारली गेली आहे. या घरांची पाहणी तळीये गावातील गावकऱ्यांनी नुकतीच केली. घराच्या रचनेत त्यांनी काही बदल सुचविले आहेत.

तळीये गावातील व आजूबाजूच्या पाड्यातील २६१ घरांची उभारणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणावर (म्हाडा) सोपविली आहे. त्या दृष्टीने वांद्रे येथील मुख्यालयाच्या प्रांगणात प्रतिकृती तयार करण्यात आली. पहिल्या टप्प्यात तळईतील ६३ कुटुंबासाठी घरांची उभारणी दिवाळीपर्यंत केली जाणार असून दुसऱ्या टप्प्यात आजूबाजूच्या पाड्यातील कुटुंबीयांसाठी घरांची उभारणी होईल. या घरांची उभारणी मार्च २०२२ पर्यंत करण्याचा ‘म्हाडा’चा प्रयत्न आहे.

हेही वाचा: मुंबईतील हाताचे पहिले प्रत्यारोपण, मोनिका मोरेच्या हातांची शस्त्रक्रिया सुरु

असे हवेत बदल

गावच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्यासाठी ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच तळीये गावाला भेट दिली होती. या भेटीदरम्यान गावातील प्रमुख व्यक्तींना ‘म्हाडा’ कार्यालयात उभारण्यात आलेली घरे पाहण्यासाठी बोलविले होते. त्यानुसार गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य प्रतिकृतींची पाहणी करत घराच्या रचनेत काही बदल सुचविले. स्टोअर रूमसाठी घरामधून आणखी एक दरवाजा तयार करून द्यावा, घराची उंची आणखी वाढवावी, प्रवेशद्वाराजवळील फाटक रुंद असावे, अशा काही सूचना केल्या आहेत.

गावातील प्रमुख व्यक्तींनी प्रतिकृतीची पाहणी केली आहे. त्यांनी काही बदल सुचविले आहेत. गावातील सर्व व्यक्तींना घराचा आराखडा दाखवून आवश्यक ते बदल सुचवावेत, अशी विनंती गावकऱ्यांना केली.

- नितीन महाजन, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ

loading image
go to top