पैसे, रेशनसाठी आईनंच लेकीला विकलं; ७० वर्षीय वृद्धाचा १० वर्षीय चिमुकलीवर २ वर्षांपासून अत्याचार

Crime News : तळोज्यात लंडनमधील एका ७० वर्षीय वृद्धानं १० वर्षांच्या मुलीवर २ वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी आरोपी वृद्धासह पीडितेच्या आईला पोलिसांनी अटक केली आहे.
70YearOld Man and Mother Arrested for Abusing 10YearOld Girl in Taloja for 2 Years

70YearOld Man and Mother Arrested for Abusing 10YearOld Girl in Taloja for 2 Years

Updated on

पनवेल : नवी मुंबईतील पनवेल-तळोजा परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना उघडकीस आली आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृद्धाने अवघ्या १० वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल दोन वर्षापासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात त्या चिमुरडीची जन्मदात्री आईच आरोपीला सक्रियपणे मदत करत असल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणात अटक केलेल्या वृद्धाचे नाव फारुक अल्लाउद्दीन शेख असून तो मूळचा पाँडेचेरी येथील रहिवासी आहे; मात्र सध्या तो लंडन येथे कुटुंबासह स्थायिक आहे. आरोपीने तळोजा येथील त्याच्या फ्लॅटवर दोन वर्षांपासून बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पैशांच्या लालसेपोटी पीडित मुलीची जन्मदाती आईच मुलीला खेळण्याच्या बहाण्याने आरोपीच्या घरी सोडून जात असे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com