Water Scarcity
खारघर : परतीचा पाऊस सुरू झाला आहे, मात्र तळोजा वसाहतीतील पाणी समस्या दूर होताना दिसत नाही. अजूनही रहिवाशांना टँकरवर तहान भागवावी लागत असून, तळोजा नोडमधील लोकसंख्येचे पूर्वावलोकन करून लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याची तरतूद केली जात नसल्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.