
Water Supply
खारघर : पाणी द्या नाही तर घरे परत घ्या आणि आमचे पैसे परत द्या, अशा आशयाचे फलक तळोजा सेक्टर २७ मधील आसावरी गृहनिर्माण सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर झळकत आहेत. चार वर्षांपासून अपुऱ्या पाणीपुरवठ्याला कंटाळलेल्या रहिवाशांनी अखेर सिडकोचा जाहीर निषेध नोंदवला आहे.