

हॉटेलमध्ये भाकरी, रोटी, चपाती यासोबतच सर्वाधिक मागणी असते ती तंदूर रोटीला. आता या रोटीबाबत मुंबई महानगरपालिकेनं हॉटेल्सने एक नोटीस बजावली आहे. कोळशाची तंदूर भट्टी वापरणाऱ्या हॉटेल्सना यापुढे कोळसा तंदूर भट्टी वापरता येणार नाही. बीएमसीने याबाबत नोटीस बजावली असून उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कोळशाच्या तंदूर भट्टी ऐवजी आता इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर करावा अशी सूचना नोटीसीद्वारे महापालिकेनं दिलीय.