मोखाडा : सकाळच्या पाठपुराव्यामुळे आदिवासींना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा

Sakal impact news
Sakal impact newssakal media

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील मोखाडा (Mokhada) तालुक्यात पाणीटंचाईने (water scarcity) आदिवासी होरपळून निघाले आहेत. येथील किनिस्ते ग्रामपंचायत हद्दीतील गवरचरीपाडा आणि ठाकूरवाडी येथील आदिवासींनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा (tanker water supply) करण्याची मागणी करूनही त्यांना पाणी मिळत नव्हते. या प्रकाराविरोधात `सकाळ`ने आवाज उठवून (sakal news impact) पाठपुरावा करताच तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी या भागासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजूर केला. या गाव पाड्यांमध्ये आता टॅंकरद्वारे पाणी येऊ लागल्याने आदिवासी महिलांची रणरणत्या उन्हातील दोन ते तीन किलोमीटरची पायपीट थांबली आहे.

Sakal impact news
पोलीस पत्नीचे नग्न फोटो केले शेअर, नातेवाईकांच्या WhatsApp ग्रुपचा पोलिसांना सुगावा

मोखाड्यातील किनिस्ते ग्रामपंचायत हद्दीतील गवरचरीपाडा आणि ठाकूरवाडी येथील विहिरी कोरड्या पडल्याने, आदिवासी महिलांना पाण्यासाठी रणरणत्या उन्हात दोन ते तीन किलोमीटर पायपीट करत, हंडाभर पाणी आणावे लागत होते. या ग्रामपंचायतीने ७ मार्चला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी तहसीलदार कार्यालयाकडे केली होती; मात्र, आठ दिवस उलटूनही तहसीलदार कार्यालयाने टॅंकर मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला नव्हता. या प्रकाराला `सकाळ`ने १५ मार्चला सर्वप्रथम वाचा फोडून हे प्रकरण चव्हाट्यावर आणले.

बातमी प्रसिद्ध होताच त्याच दिवशी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा मंजुरीचा प्रस्ताव तहसीलदार, उपविभागीय अधिकारी कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयात थेट पोहोचला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी वृत्ताची दखल घेत या गावपाड्यांचे प्रस्ताव मंजूर करून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश १६ मार्चला प्रशासनाला दिले. त्यानुसार तातडीने १७ मार्चला टॅंकर उपलब्ध करून तातडीने गवरचरीपाडा आणि ठाकूरवाडी येथे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पाणी मिळाल्याने येथील आदिवासी महिलांची रणरणत्या उन्हातील पायपीट आता थांबली आहे.

`सकाळ`च्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि आमच्या गावात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आमच्या गावातील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबल्याने दिलासा मिळाला आहे.

- आनंद शिंदे, उपसरपंच, किनिस्ते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com