उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या 48 व्यापाऱ्यांचे नळ-कनेक्शन कट

Taps connection cut of 48 traders in Ulhasnagar railway station
Taps connection cut of 48 traders in Ulhasnagar railway station

उल्हासनगर - पाण्याचे बिल भरण्याऐवजी त्याकडे डोळेझाकपणा करणाऱ्या उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेतील 48 व्यापाऱ्यांचे नळ-कनेक्शन कट करण्यात आले आहेत.

प्रभाग समिती 3 चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी,पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी राजेश वानखडे, के. जे. रहेजा, चंदर धिरमलानी, श्यामसिंग, वसंत फुलोरे यांनी शुक्रवारी एकाच दिवशी विशेष मोहीम राबवून एकत्रितपणे नळांचे कनेक्शन कट केल्याने खळबळ उडाली आहे.

पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, नंदलाल समतानी, अजित गोवारी, भगवान कुमावत यांनी अनधिकृत नळ-कनेक्शने कट करण्याची मोहीम सुरू केली आहे. ज्यांच्या नळांची कनेक्शन कट करण्यात आली आहेत. किंबहूना येणार आहेत अशा व्यापाऱ्यांनी प्रत्येकी आठ हजार रुपये भरून कनेक्शन घ्यायचे आहे. त्यासाठी पाणी पुरवठा विभागाची रितसर पावती फाडावी लागणार आहे. त्यामुळे पालिकेला लाखों रुपयांचा महसूल मिळणार आहे. ही मोहीम सातत्याने राबविण्यात येणार आहे.

ज्या व्यापाऱ्यांचे नळ-कनेक्शन कट करण्यात आले आहेत त्यांनी रुपये भरण्याऐवजी पुन्हा अनधिकृत कनेक्शन घेतले तर त्यांच्यावर नाईलाजास्तव एफआयआर नोंदवण्याचा पवित्रा पालिकेला घ्यावा लागणार आहे. शुक्रवार पर्यन्त सुमारे सातशेच्या आसपास अनधिकृत नळ कनेक्शन कट करण्यात आली असून त्यात सर्वाधिक कनेक्शने कट करण्याची कामगिरी सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या प्रभाग समिती तीन ने केली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विनोद केणे यांनी दिली
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com