शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स; डॉ. वसुधा कामत यांच्याकडे अध्यक्षपद

तेजस वाघमारे
Saturday, 19 September 2020

उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स तयार केला आहे

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्स तयार केला आहे. या फोर्सचे अध्यक्षपद शिक्षण धोरण समितीच्या सदस्य आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत यांच्याकडे देण्यात आले आहे. शिक्षण धोरणातील मुद्दयाचा अभ्यास फोर्स आपला अहवाल तीन महिन्यात सादर करेल.

महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना 100 टक्के उपस्थिती सक्तीची उपस्थितीला प्राध्यापकांचा विरोध; अध्यादेश रद्द करण्याची मागणी

या समितीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगरु डॉ. राजन वेळूकर, डॉ. भालचंद्र मुणेकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, हिरानंदानी समुहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी, मराठवाडा वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास गोल्हार, शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचे प्राध्यापक भालचंद्र बिराजदार, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अजिंक्य पाटील, मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य मिलिंद साटम, पार्ले टिळक व्यवस्थापन कॉलेजचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. अजित जोशी आणि तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांचा समावेश आहे. तर समितीचे समन्वयक म्हणून उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Task Force for Education Policy Implementation Dr Vasudha Kamat holds the chairmanship