को्व्हिड काळात कर्करोगाशी लढणाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी टाटा रुग्णालयाचा पुढाकार; 'ही' हेल्पलाईन केली सुरू

भाग्यश्री भुवड
Saturday, 8 August 2020

कोव्हिड साथीच्या काळात कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटूंबियांना प्रचंड मानसिक दडपणाला सामोरे जावे लागत आहे. अशांना मानसिक आधार देण्यासाठी परळ टाटा स्मारक केंद्र रुग्णालयाने हेल्पलाईन सुरु केलीआहे.

मुंबई : कोव्हिड साथीच्या काळात कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटूंबियांना प्रचंड मानसिक दडपणाला सामोरे जावे लागत आहे. अशांना मानसिक आधार देण्यासाठी परळ टाटा स्मारक केंद्र रुग्णालयाने हेल्पलाईन सुरु केलीआहे. 09511948920 या हेल्पलाईनवरुन तज्ञ समुपदेशकां मार्फत समुपदेशन करणार असून रुग्णाचा पाठपुरवाही करण्यात येणार आहे.

. आणि यामुळे रियाची याचिका अर्थहीन; सुशांतच्या वडिलांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

कर्करोगाचे नाव ऐकले तरी आजही काळजाचे पाणी होते. त्यात कोविड साथी मुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.अशा परीस्थीतीत रुग्ण आणि त्यांच्या कुटूंबियांना प्रचंड मानसिक दडपण आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आठवड्याचे सातही दिवस  हेल्पलाईन कार्यरत राहाणार आहे. त्यावरुन इंग्रजी मराठी आणि हिंदीत समुपदेशन करण्यात येईल. टाटा स्मारक केंद्र,सिपला पॅलेटिव्ह केअर आणि प्रशिक्षण केंद्र, मुंबई आणि पुणे महापालिकेच्या सहाय्याने ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर कॉल करणार्या रुग्णांचा पाठपुरवाही करण्यात येणार आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनाबाबत अखेर महामंडळाने काढले परिपत्रक

तीघांपैकी एक दडपणात 
कर्करोग झालेल्या तीन व्यक्ती पैकी एक व्यक्ती मानसिक दडपणाखाली असते.सामजिक आर्थिक दडपण तर असतेच.त्यातच सध्याच्या परीस्थीतीत कर्करोगाच्या उपचारातही अडथळे येत असल्याने मानसिक दडपण अधिक वाढले आहे.कर्करोगाचे उपचारात मानसिक आरोग्यही महत्वाचे मानले जाते.

कोविड साथीच्या काळात कर्करोग रुग्णांच्या खासकरुन अॅडव्हान्स स्टेेेेेज मधिल रुग्णावर प्रतीकुल परीणाम झाला आहे.या हेल्पलाईनच्या माध्यमातून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना असलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.रुग्णांचा वेळोवेळी पाठपुरवाही करण्यात येणार आहे.-
डॉ.राजेंद्र बडवे, संचालक टाटा स्मारक केंद्र रुग्णालय 

 

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tata Hospitals initiative for mental health of cancer patients