दूध टंचाईमुळे शहरातील चहाची दुकानेही बंद

दूध टंचाईमुळे शहरातील चहाची दुकानेही बंद
दूध टंचाईमुळे शहरातील चहाची दुकानेही बंद

नवी मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे सांगली, कोल्हापूर येथून मुंबई आणि उपनगर परिसराला होणारा दूधपुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे. या दूधटंचाईचा परिणाम नवी मुंबईतील चहाच्या दुकानांवरही दिसून आला. शहरातील येवले अमृततुल्यसह चहाची अनेक दुकाने गुरुवारी (ता.८) दुधाअभावी बंद ठेवण्यात आली.

काही दुकानदारांनी गोकुळ, वारणाऐवजी अमूलचा पर्याय स्वीकारल्याने त्यांना फारसा फरक जाणवला नाही; मात्र येवले अमृततुल्यसारख्या चहाच्या साखळीविक्रेत्यांवर आपली दुकाने सकाळी ११ नंतर बंद ठेवण्याची वेळ आली. सीवूड्‌स येथील येवले चहाचे दुकान दूध नसल्याने बंद ठेवण्यात आले होते; तर नेरूळमधील दुकान सकाळी ११ वाजेपर्यंतटच सुरू होते. 

आज एक थेंबही दूध मिळाले नाही. कालचे दूध शिल्लक होते. त्यामुळे ११ वाजेपर्यंत दुकान सुरू होते. आम्ही चहासाठी गोकुळचे दूध वापरतो. आता येवले कंपनीकडून सांगण्यात आले की, तुम्ही अमूल गोल्ड किंवा चितळे वापरू शकता. 
- अंबादास तोडकर, येवले चहा, नेरूळ.

आज अवघे १५ लिटर दूध मिळाले. गोकुळ दूध नसल्याने दुसऱ्या कंपनीचे दूध घ्यावे लागले. १२ च्या आतच दुकान बंद करावे लागले. चहाची चवही बदलल्याने काही ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. 
- सूरज पुरोहित, आशापुरा टी हाऊस, नेरूळ.

दर दिवशी दोनशे ते अडीचशे लिटर दूध लागते. रोज ३ ते ४ हजार कप चहाची विक्री होते. तुटवड्याची पूर्वकल्पना असल्याने दुधाचा साठा करून ठेवला होता. त्यामुळे फारसा फरक पडला नाही.
- काकासाहेब खाडे, अभिनंदन स्पेशल टी, बेलापूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com