डहाणूत गाय अडली अन्‌ गुरुजी झाले ‘रॅंचो’

डहाणू ः जन्मानंतर वासराला कुरवाळताना गोमाता.
डहाणू ः जन्मानंतर वासराला कुरवाळताना गोमाता.

डहाणू ः ‘बेटा काबील बनो, कामयाबी अपने आप तुम्हारे पीछे आएगी’, असा गुरुमंत्र देणाऱ्या ‘थ्री-इडियट’ सिनेमातील रणछोडदास शामलदास छांचड ऊर्फ फुंगसूक वांगडू याचा कित्ता डहाणूत एका प्राथमिक शिक्षकाने गिरवला आहे. त्या सिनेमात डॉक्‍टर नायिकेने व्हिडीओ कॉलवरून दिलेल्या सल्ल्यानुसार नायकाने नायिकेच्या बहिणीची सुरक्षित प्रसूती केली होती. इथे गुरुजींनी एका अडलेल्या गाईला जीवनदान दिले. या वास्तव कथेतील नायिका या शिक्षकाची पशुवैद्यक पर्यवेक्षक पत्नी आहे, हे विशेष.

डहाणू तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक जयवंत तुकाराम गंधकवाड असे या कथेतील नायकाचे नाव असून त्यांची पत्नी मीना यांनी त्यांना मदत केली. या जोडीमुळे गाईची प्रसूती करून वासराला आणि जन्मदात्या गोमातेला जीवनदान मिळाले. शिक्षकाच्या सहृदय वस्तपिाठाची सर्वत्र चर्चा रंगलीय. त्यांच्या या अनोख्या सेवाकार्याचे कौतुक होत आहे.

रायतळी-गडगपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत सेवेत असलेले जयवंत गंधकवाड हे तालुक्‍यातील उत्तम संगीत कलाशिक्षक म्हणून परिचित आहेत. तबलावादन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. उपक्रमशील शिक्षक म्हणून ते विद्यार्थीप्रिय आहेत. शनिवारी (ता. १६) सकाळी साडेसहाच्या सुमारास कामावर जात असताना डहाणू किल्ल्याजवळील हनुमान मंदिराच्या बाजूला रस्त्यावर एक गाय प्रसूतीसाठी पडली होती. कित्येक प्रयत्न करून गाईच्या गर्भातील वासरू अडकल्याने ते बाहेर येईना.

यामुळे सर्व शक्ती खर्ची झाल्याने गाय गर्भगळीत झाली होती. अशक्त झालेल्या गोमातेला पाहिल्यानंतर गंधकवाड यांनी गाईची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.
पत्नी मीना यांनी दिलेल्या सूचनेनुसार गंधकवाड यांनी गाईच्या प्रसूतीसाठी प्रयत्न केला. वासरू गर्भात अडकले असल्याने बाहेर येण्यासाठी मोठी अडचण येत होती. वासराचे डोके दुसऱ्या दिशेला होते. तसेच वासराच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळलेली असल्याचे समजताच गंधकवाड यांनी गाईच्या गर्भात हात घालून वासराच्या डोक्‍याला योग्य दिशेत केले.

त्यानंतर गर्भाशयाच्या मुखातून आलेल्या वासराचे पुढील दोन्ही पाय हळूहळू बाहेर खेचले. गंधकवाड यांनी मोठ्या धैर्याने आणि प्रसंगावधान राखून या मुक्‍या जीवांना जीवनदान दिले. उशीर झाला असता, तर गाईच्या पोटातच वासरू दगावण्याची शक्‍यता होती. त्यामुळे गाईचादेखील मृत्यू झाला असता; मात्र गंधकवाड दाम्पत्याने दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रसूती व्यवस्थित झाली.

कल्पना कामी आली
शनिवारी सकाळी गाय रस्त्यावर पडली होती. वासराला जन्म देण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. ती थकली. निपचित पडली. गांभीर्य लक्षात घेऊन गंधकवाड यांनी डहाणूतील पशुवैद्यक डॉ. भोईर आणि डॉ. गहला यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो झाला नाही. गाईच्या वेदना पाहून त्यांनी पत्नीला फोन केला. त्या नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक पदावर सेवेत आहेत. पत्नी मीना यांनी त्यांना सूचना केल्या. सुमारे ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर गाईचे प्रसव करण्यात त्यांना यश आले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून त्यांनी दोन जीवांना वाचवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com