त्या शिक्षकांच्या नियुक्‍तीबाबत सविस्तर भूमिका मांडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

मुंबई - ठाणे जिल्ह्यात नियुक्तीचा पर्याय स्वीकारलेल्या शिक्षकांची पालघर जिल्ह्यामध्ये निवड करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई - ठाणे जिल्ह्यात नियुक्तीचा पर्याय स्वीकारलेल्या शिक्षकांची पालघर जिल्ह्यामध्ये निवड करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षक पदावर रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर याचिकादार शिक्षकांच्या नियुक्तीचेही विभाजन करण्यात आले आहे. याबाबत केलेल्या पर्यायनिवडीमध्ये शिक्षकांनी ठाण्याची निवड केली होती; मात्र राज्य सरकारकडून काही शिक्षकांना पालघरचा पर्याय देण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी याबाबत सरकारने शासकीय अध्यादेश जारी केला होता. त्यानुसार शिक्षकांची ठाणे जिल्ह्यात नियुक्ती झाली; मात्र दुसरा अध्यादेश गतवर्षी जारी केला आणि त्यावरून केलेल्या नियुक्तीमध्ये याचिकादारांचा पालघरमध्ये समावेश आहे. कामाच्या नियोजनाच्या दृष्टीने अशा प्रकारचा बदल करण्यात आला आहे, असा खुलासा सरकारी वकिलांनी केला आहे. याबाबत शिक्षण विभागाने सविस्तर भूमिका मांडावी, असे निर्देश सुटीकालीन न्या. व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

Web Title: teacher selection detailed high court