पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेवर बहिष्काराचा इशारा

पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द पण शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची आडमुठी भूमिका कायम
Exams
Exams
Summary

पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द पण शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची आडमुठी भूमिका कायम

मुंबई: राज्यात सर्वत्र कोरोनाचा (Coronavirus) कहर सुरू असल्याने दहावीपासून अनेक परीक्षा रद्द करण्यात आलेल्या असताना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (Maharashtra State Exam Board) मात्र पाचवी, आठवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship) ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी आपला अट्टहास कायम ठेवला आहे. यासाठी राज्यातून त्यांनी या परीक्षेसाठी गोपनीय अहवाल मागविण्यासाठी शिक्षण विभागाला (Education Department) आदेश दिले आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीची ही परीक्षा ऑफलाईन घेण अत्यंत धोक्याचे आहे. यामुळे ही परीक्षा आम्ही रद्द करण्याची वेळोवेळी मागणी करूनही त्यावर निर्णय होत नसल्याने आम्ही या परीक्षेवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे, शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस आदीनी दिला आहे. (Teachers Council Warning Maharashtra State Exam Board to Boycott Scholarship Exams)

Exams
"भाजपने हवं तर मराठा आरक्षणाचं श्रेय घ्यावं, पण..."

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 23 मे रोजी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अथवा रद्द करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेकडून वेळोवेळी केली जात आहे. त्यासाठी आत्तापर्यंत तीनवेळा पत्र देण्यात आल्याची माहिती दराडे यांनी दिली. मात्र पत्रानंतर परीक्षा परिषदेने या परीक्षेसाठी राज्यातील पर्यवेक्षण व अन्य बाबींचे नियोजन करण्यासाठी गोपनीय अहवाल मागविला असून त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात या परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाल्याने आम्ही या परीक्षेवर बहिष्कार टाकणार असू त्यासाठीचे पत्र शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आणि शिक्षण आयुक्तांना दिले असल्याचेही दराडे यांनी सांगितले.

Exams
मराठा आरक्षणाचा लढा संपलेला नाही- अशोक चव्हाण

राज्यभरात एकूण 6 लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. एका परीक्षा केंद्रावर 200 ते 500 परीक्षार्थी असतात. तेवढ्याच प्रमाणात पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांची नियुक्ती करावी लागतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षा कोविडच्या काळात घेणे अत्यंत धोकादायक असल्याचे शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस म्हणाले.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com