esakal | पत्नीला मारहाण करणाऱ्या शिक्षक पतीला कारावास
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पत्नीला मारहाण करणाऱ्या शिक्षक पतीला कारावास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मनोर : मनोर (Manor) गावात वास्तव्यास असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेला शिक्षक असलेला पती पैशांच्या मागणीसाठी छळ करून मारहाण करीत होता. याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याची सुनावणी गेल्या सहा वर्षांपासून पालघरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती.

नुकताच पालघर जिल्हा न्यायालयाने सुनावणीचा निकाल देत महिलेच्या पतीला सहा महिने कारावास आणि पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. मनोरला राहणाऱ्या जिल्हा परिषदेच्या क शाळेत शिक्षिकेचा पती सुदर्शन प्रकाश पाटील (मुळ गाव, पडळ, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) याने ११ सप्टेंबर २०१५ रोजी पैशांच्या मागणीसाठी पत्नीला ठोशाबुक्क्यांनी आणि लाकडी लाटण्याने बेदम मारहाण केली होती.

हेही वाचा: मुंबई : सप्टेंबर मध्ये दिले 29 लाख 51 हजार 157 डोस; विक्रमी लसीकरणाची नोंद

मारहाणीत डोक्याला, तोंडाला दुखापत झाल्याने बेशुद्ध अवस्थेत त्या शिक्षिकेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पतीकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून या शिक्षिकेने २०१५ रोजी पतीविरोधात मनोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

loading image
go to top