शाळांच्या अनुदानासाठी कोणतीही तरतूद नसल्याने शिक्षक संघटना नाराज

मागील सरकारने अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा आणि तुकड्यांना 1 एप्रिल 2019 रोजी 20 टक्के अनुदान देण्याचे घोषित केले होते.
School teacher
School teachersakal
Summary

मागील सरकारने अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा आणि तुकड्यांना 1 एप्रिल 2019 रोजी 20 टक्के अनुदान देण्याचे घोषित केले होते.

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शिंदे- फडणवीस सरकारकडून आज मांडण्यात आलेल्या पुरवण्या मागण्यात राज्यातील अनुदानास घोषित ठरलेल्या शाळांच्या अनुदानासाठी एक रुपयाची ही तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे या सरकारनेही राज्यातील शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतराना वाऱ्यावर सोडल्याची भावना शिक्षक संघटनांमध्ये निर्माण झाली आहे.

मागील सरकारने अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा आणि तुकड्यांना 1 एप्रिल 2019 रोजी 20 टक्के अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार 20 टक्के अनुदान 1 एप्रिल 2019 पासूनच हे वाढीव अनुदान दिले जाणार होते. त्यासाठी 6 सप्टेंबर 2019 रोजी शासन निर्णयही जारी करण्यात आला. परंतु मध्येच यादरम्यान ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, या नव्या सरकारने त्यापूर्वीच्या शासन निर्णयात काही बदल करून या शाळा, तुकड्यांना त्रुटी काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे 20 टक्के अनुदान नाकारण्यात आले होते. यानंतर या शाळांनी निर्देशित केलेले त्रुटी पूर्ण केल्या. यासाठी अनेक बैठका, आंदोलने करण्यात आल्यानंतर त्या शाळा तुकड्याना अनुदानाची तरतूद तत्कालीन वित्तमंत्र्यांनी नोव्हेंबर 2020 पासून करण्यासाठी 177.7 कोटी रुपयांचा निधी घोषित केला होता. परंतु आतापर्यंत त्या तरतुदीतील कोणतेही वेतन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. त्यातच आजच्या पुरवण्या मागण्यातही या मागील सरकारच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या निधीचा कुठलाही उल्लेख नसल्याने शिक्षक संघटनांकडून याविषयी नाराजी व्यक्त केली जाते आहे.

मागील सरकारने जाहीर केलेली आर्थिक तरतूद आत्तापर्यंत शिक्षक आणि शिक्षकेतर यांच्या वेतनासाठी देण्यात आली नाही. शासन निर्णय जारी करूनही दोन वर्षे झाली तरी त्यासाठी निधी मिळत नाही. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आजच्या पुरवण्या मागण्यात किमान काही तरतूद होणे अपेक्षित होते, परंतु तीही न झाल्याने ही मोठी खंत आहे.

- नागो गाणार, शिक्षक आमदार

अशा आहेत अनुदानासाठीच्या शाळा

20 टक्के अनुदानास घोषित झालेल्या एकूण शाळा 383 आणि 413 तुकड्या आहेत. यातील शाळांवर 2 हजार 578 शिक्षक आणि तुकड्यावर 195 शिक्षकेतर कर्मचारी यांना 20 टक्के अनुदान मिळणे आवश्यक आहे.

दुसरीकडे यापूर्वी ज्या शाळांना 20 टक्के अनुदान यापूर्वी प्रदान करण्यात आले आहे, त्यांना वाढीव 20 टक्के अनुदान देण्यासाठी 284 शाळांनी आणि 724 तुकड्यानी सर्व प्रकारच्या त्रुटी पूर्ण केल्या आहेत. या शाळा आणि वर्ग तुकड्यांवर 2 हजार 437 शिक्षक आणि 710 शिक्षकेतर कर्मचारी यांना वाढीव 20 टक्के अनुदान मिळणे अपेक्षित आहे.

पुरवण्या मागण्यातील तरतूद...

आज जाहीर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यात शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागासाठी प्रामुख्याने तीन विषयासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यात बुलढाणा, यवतमाळ, वाशिम व जालना येथील सैनिकी शाळामधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वाढीव आणि अनुदानासाठी 31 लाख 59 हजार रुपये इतका निधी ठेवण्यात आला आहे. सोलापूर येथील शिवशंकर थोबडे प्रशाळेतील एकूण आठ शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या वेतनासाठी 46 लाख 51 हजार रुपयांचा निधी देण्याचे ठरविण्यात आले आहे. तर राष्ट्र शास्त्र सेना योजनेअंतर्गत छात्रांना अल्पोहापार भत्ता देण्यासाठी ८ कोटी ८५ लाख २७ हजार, चंद्रपूर येथील क्रीडा संकुलाच्या बांधकाम आणि विद्युतीकरणासाठी ३ कोटी 38 लाख 42 हजार इतकी तरतूद करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com