
मुंबई : कुर्ला स्थानकात शुक्रवारी संध्याकाळी सिग्नल यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. हा बिघाड तब्बल ४० मिनिटे कायम राहिल्याने गर्दीच्या वेळेत प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. लोकलगाड्या थांबल्याने प्लॅटफॉर्म आणि लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली, परिणामी शुक्रवारी कामावरून घरी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.