
मुंबई : स्मार्ट सिटी मानलं जाणाऱ्या मुंबई शहरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये एका तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडच्या अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी महिलेसह तिच्या १९ वर्षीय बॉयफ्रेंडला अटक केली. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरून गेली आहे.