वसईच्या अल्पवयीन तरुणाचा मास्टरमाईंड प्लॅन फसला! गरजेसाठी गेला खालच्या थराला

सुमित बागुल
Wednesday, 20 January 2021

"आरोपी हा वसईचा रहिवासी असून तो अल्पवयीन आहे म्हणून आम्ही त्याला अटक केलेली नाही." - पोलिस 

मुंबई : आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मुलं कोणत्या थराला जाऊ शकतात याचा काहीही नेम नाही. ही बातमी वाचून तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मुंबईतील वसई भागामध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे तुम्ही डोक्याला हात मारून घ्याल. अशा बातम्यांच्या माध्यमातून मुलांची मानसिकता कोणत्या थराला जातेय, याचा काहीसा अंदाज तुम्ही बंधू शकतात. वसईत एका मुलाने चक्क आपल्या रिटायर्ड आजोबांच्या सेल्स टॅक्स ऑफिसरच्या जुन्या आयडी कार्डचा वापर करून एका दुकानदाराला गंडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. दुकानदाराला संशय आल्यानंतर त्यांनी या मुलाला पुन्हा आयडी कार्ड दाखवण्यास सांगितलं, आयडी निरखून पाहिल्यावर मुलाचा प्लॅन फसला आणि सर्व प्रकार उघडकीस आला. 

महत्त्वाची बातमी : लहान सदनिकाधारकांसंदर्भात महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय, आता सामान्यांच्या खिशाला पडणार चाट

32 वर्षीय अली असगर यांचं वसईतील आनंदनगरमध्ये सेकंडहॅन्ड मोबाईलचं दुकान आहे. सोमवारी दुपारी एक वाजता सदर 17 वर्षीय मुलगा 'महाराष्ट्र शासन' असा फलक लावलेली चारचाकी गाडी घेऊन आला. याबाबत दुकान मालकाने सर्व माहिती माध्यमांना दिली, "दुकानात आलेला सदर व्यक्ती एखादा सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून भासवत होता, मात्र वयाचा संशय आल्याने दुकानदाराने आयडी कार्ड आग्रह करून मागितलं. सुरवातीला आयडी कार्ड दाखवण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुलाला अखेर आपलं आयडीकार्ड दाखवावं लागलं. धक्कादायक बाब म्हणजे या आयडीवरील फोटो हा एका वयस्कर माणसाचा होता. मुलाला याबाबत विचारणा केली असता त्याने सदर फोटो त्यांच्या वरिष्ठांचा असल्याचं सांगितलं. यानंतर दुकानदाराने त्याला थांबण्यास सांगून पोलिसांना फोन केला. सदर मुलगा दुकान लुटण्याच्या बहाण्याने आला होता, असंही दुकानदाराने सांगितलं.

महत्त्वाची बातमी : शिवसेनेकडून टिपू सुलतानचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी, भाजपची घणाघाती टीका

माणिकपूर पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब अहिरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली, ते म्हणालेत की "आरोपी हा वसईचा रहिवासी असून तो अल्पवयीन आहे म्हणून आम्ही त्याला अटक केलेली नाही. परंतु या घटनेची आम्ही दखल घेऊन त्याला वडिलांच्या ताब्यात स्वाधीन केले आहे." पोलिसांनी या मुलाकडील गाडी जप्त केली आहे.

दुकान मालक असगर यांनी याबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. असगर म्हणतात की, "या मुलावर सरकारी नोकरीच्या तोतयागिरीसाठी गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्हा हा अजामीनपात्र असतो. मात्र मुलगा अल्पवयीन असल्याने त्यावर मोटार वाहन कायद्याअंतर्गतही गुन्हा का नोंदवला गेला नाही?  असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

teenager showed grandfathers ID card to loot shop mumbai crime


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teenager showed grandfathers ID card to loot shop mumbai crime