हिंदू पत्नीला मिठी मारुन युवकाचे केंद्रीय मंत्री हेगडेंना आव्हान

Tehseen Poonawalla challenges to central minister anant kumar hegde
Tehseen Poonawalla challenges to central minister anant kumar hegde

केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांना आव्हान देणाऱ्यांमध्ये आणखी एक नाव सामील झाले आहे. हेगडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत तेहसीन पूनावाला या युवकाने आपल्या हिंदू पत्नीसोबत मिठी मारतानाचा फोटो ट्विट करुन हेगडे यांना आव्हान केले आहे. 

कर्नाटकचे काँग्रेस मंत्री दिनेश गुंडू यांच्या पत्नी तब्बू राव यांच्या पाठोपाठ तेहसीन पूनावाला यांनी पत्नीसोबतचा फोटो टि्वट करुन केंद्रीय मंत्री हेगडे यांना आव्हान दिले आहे. पूनावाला यांनी टि्वट करुन 'तुम्ही जे करु शकता ते करा. हे मी तुम्हाला आव्हान करतो,' असे आव्हान अनंत कुमार हेगडे यांना दिले आहे. 
 


'हिंदू मुलींना स्पर्श करणारे हात मुळापासून तोडून टाका. तुम्ही ज्यावेळी इतिहास लिहाल तेव्हा तुमच्यात हिंमत येते,' असे विधान अनंत कुमार हेगडे यांनी रविवारी केले होते. 'अन्य धर्मातल्या मुलांनी हिंदू मुलींना स्पर्श केला तर हिंदू मुलांनी ते हात तोडून इतिहास रचण्यासाठी सज्ज रहावे,' असेही हेगडे यांनी म्हटले होते.

एका फेसबुक पोस्टमध्ये तब्बू राव म्हणाल्या, 'भाजपासाठी मी एक ‘सॉफ्ट टार्गेट’ बनली आहे. माझ्या पतीचा सामना करण्यात त्यांना अपयश येत असल्यामुळे ते मला लक्ष्य करत आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसताना अनंतकुमार यांनी मला उगाच या राजकीय चिखलफेकीत ओढले आहे.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com