'तेजोमयी दिवस' लघूपट लवकरच प्रक्षकांच्या भेटीला

kalyan.
kalyan.

कल्याण - दहा ते चौदा वर्षीय मुलींना भेडसावणाऱ्या समस्यांवर आधारित तेजोमय दिवस लघुपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले असून, लवकरच हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिग्दर्शक अजय पाटील यांनी सकाळला दिली.

दहा ते चौदा वयोगटातील मुलींची मासिक पाळी जेव्हा सुरू होते त्या बद्दलची योग्य ती माहिती मुलींना मिळाली पाहिजे. परंतु, आपल्या परंपरेनुसार व संस्कृतीनुसार या विषयावर उघडपणे कोणी बोलत नाही. घरातील आई-वडील भाऊ-बहीण इतकेच काय तर शाळेतील पुरुष शिक्षकांकडून कधीकधी योग्य ते मार्गदर्शन मुलींना मिळत नाही. अशावेळी या वयोगटातील मुलींची मानसिक कुचंबणा होते. कधी कधी मुलींमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते. मासिक पाळी हा प्रॉब्लेम वाटू लागतो, ती समस्या वाटते. परंतु, प्रजननासाठी मासिक पाळी ही निसर्गाने मुलींना दिलेली महान देणगी आहे. मासिकपाळी बाबत सकारात्मक विचार केला पाहिजे. या विषयावरती मुलींबरोबर आपण चर्चा करायला पाहिजे. मुलींनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. याच विचारावर आधारित तेजोमयी दिवस या

लघुचित्रपटाची निर्मिती लक्ष्मी चित्रच्या बॅनर खाली अजिता अजय पाटील यांनी केली आहे. या लघुचित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन पिसवली शाळेमध्ये कार्यरत असलेले शिक्षक अजय पाटील यांचे आहे.

तर लघुचित्रपटात डॉ. तरुलता धानके, पंकज चव्हाण, सुनिता कांबळे, ज्योती अय्यर, विद्या बाळदकर, उमेश आडे, विनोद राठोड, कविता पवार, संभाजी साळुंखे, आकाश पाटील, शारदा चौधरी, महेंद्र अढांगळे, प्रियांजली शहा, प्रमोद पाटोळे, साधना आरबळे, सुनिता साकुरे, करण सांगळे, विशाल चव्हाण, आणि अजय पाटील यांनी अभिनय केला आहे.

कॅमेरामन उन्नी नायर, स्थिरचित्रण रुद्र तरतरे, मेकअप सोहम कोचरेकर, कला महेंद्र अढांगळे यांनी काम केले आहे.या चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग पिसवली शाळा आणि कल्याण परिसरामध्ये नुकताच पूर्ण करण्यात आले आहे.दिग्दर्शक अजय पाटील यांनी सांगितले की लवकरच हा लघुचित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

शालेय जीवनात शिक्षकांनी मुलींना समजून घेणे अपेक्षित असते. घरी पालक मुलींबरोबर या विषयावर बोलत नाहीत. पण अत्यंत अडचणीच्या वेळी मुलींनी आपल्या शिक्षक व पालकांची मदत घेतली पाहिजे. या विषयावर उघडपणे चर्चा न केल्याने शारीरिक व मानसिक आजार होतात. मुलींची शाळा बुडवून अभ्यास बुडतो. यामुळे हा विचार मनात आला आणि गेल्या आठ महिन्यापासून कथा पटकथा लेखनाला सुरुवात केली. आणि नुकताच पिसवली शाळेत व कल्याण परिसरात शुटींग पूर्ण केली असून मासिकपाळी बद्दलची नकारात्मक प्रवृत्ती दूर व्हावी, ऐन अडचणीच्या वेळी आई - वडील, शिक्षक यांची मदत मुलींनी घ्यावी असा संदेश यातून दिला असल्याची माहिती अजय पाटील यांनी दिली.

अजय पाटील हे मागील 30 वर्ष शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून काम करत असताना यापूर्वी माझ्या गुरुजीची गाडी, आम्ही फुले बोलतोय, बंधारा, धुळवड हे शैक्षणिक लघुपट लेखन व दिग्दर्शन केले आहे. त्यांना उत्तम यश लाभले आहे. शिक्षकी पेशात असतांनाही कला क्षेत्रात पिसवली शाळेतील मुलांना पुढे आणले असून, नवीन लघुपटाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष्य लागले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com