हुडहुडी वाढली, तीन वर्षातील तापमानाचा निच्चांक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

मुंबई : मुंबईतील गुलाबी ठंडीची जागा आज हूडहूडी भरवणाऱ्या थंडीने घेतली आहे.गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी म्हणजे 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची आज नोंद झाली. या पुर्वी 2015 मध्ये डिसेंबर महिन्यात 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

मुंबईत डिसेंबरच्या मध्या पासून थंडी सुरु होते. मात्र, यंदा कमाल तापमानात घट होत नसल्याने दुपारी घामाच्या धारा वाहात होत्या तर रात्री पासून पहाटे पर्यंत गारवा जाणवत होता.मात्र,बुधवार पासून दुपारही गार वारे जाणवू लागले. त्यातच आज तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली. बुधवारी मुंबईत किमान तापमान 17.4 अंश नोंदवण्यात आले होते.मात्र,काही तासातच तापमान पाच अंशाने खाली आले.नव्या वर्षाच्या सुरवाती पर्यंत मुंबईत अशीच परिस्थिती राहाणार आहे. 

यापूर्वी मुंबईत 24 डिसेंबर 2015 ला 11.4 अंश तापमान नोंदविण्यात आले होते. गेल्या तीन वर्षात आज मुंबईतील तापमान सर्वात कमी पातळीवर पोहचले आहे. थंडीचा जोर वाढू लागल्यामुळे शहरात आता उबदार कपड्यांचा वापर वाढला आहे. 

Web Title: temperature declines and extreme low temperature in 3 years