मुंबईत तापमानात 3 अंशांनी घट आजही पावसाची शक्यता; उकाड्यापासून दिलासा

समीर सुर्वे
Sunday, 13 September 2020

शहरात आज झालेल्या हलक्‍या पावसामुळे मुंबईला दिलासा मिळाला आहे. सांयकाळपर्यंत तापमानात 3 अंशांची घट नोंदविण्यात आली.

मुंबई : शहरात आज झालेल्या हलक्‍या पावसामुळे मुंबईला दिलासा मिळाला आहे. सांयकाळपर्यंत तापमानात 3 अंशांची घट नोंदविण्यात आली. मुंबई, ठाणे, पालघरसह संपुर्ण कोकणात रविवारीही (ता. 13) पावसाचा अंदाज असून काही भागात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. मुंबईत काही भागात ताशी 45 ते 55 किलोमिटर वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता आहे. तर, रायगड जिल्ह्यातील काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

मुख्यमंत्री, शरद पवार आणि संजय राऊतांना धमकी देणाऱ्याला अटक; एटीएसची कारवाई

रायगडसाठी मुंबई वेधाशाळेने अंबर अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आज सकाळपर्यंत कुलाबा येथे कमाल 33.2 आणि किमान 25.2 अंश सेल्सिअस आणि सांताक्रुझ येथे 33.8 कमाल आणि 26 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मात्र, दुपारी मुंबईतील काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तापमानात घट झाली. संध्याकाळपर्यंत कुलाबा येथे कमाल 30.2 आणि किमान 26 अंश सेल्सिअस आणि सांताक्रुझ येथे कमाल 32.1 आणि किमान 25.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबईत कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; कोरोनामुक्तीच्या दरातही घट; 11 दिवसांत 2 टक्क्यांनी कमी

गेल्या आठवड्यात मुंबईत पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे कमाल तसेच किमान तापमानातही वाढ झाल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र, आज झालेल्या पावसाने मुंबईला काहीसा दिलासा मिळाला आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temperature drops by 3 degrees in Mumbai