तापमानात पुन्हा वाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई - मुंबईतील किमान आणि कमाल तापमानात रविवारीही (ता. 16) वाढ झाली. किमान तापमान 22.7 अंश आणि कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावात घट झाल्याने सध्या तापमानात वाढ होत आहे. थंडीत तापमानात सतत घट नव्हे, तर चढ-उतार होतो. उत्तरेकडून थंडीचे वारे पुन्हा वाहू लागल्यानंतर तापमापकातील पारा खाली जाईल, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी (ता. 17) कमाल तापमान 33 अंश आणि किमान तापमान 21 अंश राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.
Web Title: Temperature Increase in Mumbai