मुंबईचे तापमान 38.3 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

मुंबई - सूर्य आग ओकू लागल्याने मुंबईचे मंगळवारचे कमाल तापमान 38.3 अंश सेल्सिअसवर पोचले होते. या तापमानवाढीमुळे उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत.

मुंबई - सूर्य आग ओकू लागल्याने मुंबईचे मंगळवारचे कमाल तापमान 38.3 अंश सेल्सिअसवर पोचले होते. या तापमानवाढीमुळे उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत.

फेब्रुवारीतील कमाल तापमानाच्या नोंदीनुसार 22 फेब्रुवारी 2012 रोजी मुंबईचे तापमान 39.1 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. चालू दशकातील ते सर्वाधिक तापमान होते. त्याखालोखाल 23 फेब्रुवारी 2015 रोजी 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. आज मंगळवारी 38.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तीन दिवसांनंतर तापमानात थोडा बदल होईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उप महासंचालक के. एस. होसाळीकर यांनी वर्तवला. सध्या तापमानात चढ-उतार होतील. त्यानंतर उन्हाळा सुरू होईल, असेही ते म्हणाले.

Web Title: temperature increase in mumbai