तापमानात दोन अंशांनी घट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जुलै 2018

मुंबई - गुरुवारी 31 अंशावर पोहोचलेला कमाल पारा आज दोन अंशांनी खाली उतरला. मुंबईतील कमाल तापमान आज 29.6 अंश सेल्सिअसवर आले. पारा सरासरीएवढा आल्याची नोंद मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली. परंतु दोन दिवसांत तापमान पुन्हा वाढेल, असा अंदाजही वर्तवला.

सध्या मुंबईत पावसाची फारशी कामगिरी नाही. पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यताही नाही. परंतु, बंगालच्या उपसागरात येत्या काही दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. हा पट्टा दोन दिवसांत तयार होईल, त्यानंतर किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढेल, अशी आशा वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

Web Title: Temperature reduction of two points