जेजे जंक्शन येथे अपघात दहा जण जखमी

दिनेश चिलप मराठे 
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई - काल रात्री आठ वाजता जेजे जंक्शन येथून दोन टाकीकड़े जाणाऱ्या टॅक्सीचा चालक रिजवान खान(26) याच्या निष्काळजी पणामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे टॅक्सी रत्याच्या विरुद्ध दिशेला घूसली. या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत. ज्यामध्ये तिन मोटर सायकल स्वारांचा समावेश आहे. अपघात झाल्यानंतर पोलिस तातडिने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष गायकवाड यांनी दिली. 

एपीआई अशोक सरमाले, ईश्वर पाटील हे पुढील तपास करत आहेत. जेजे अपघातात दाखल करण्यात आलेल्या जखमींची नावे पुढाल प्रमाणे..
रिझवान खान (26), खालिद अहमद (30), शकील मस्तान (38), मोहम्मद आरिफ (22), पशुपति (40), अब्दुल शेख (52), अब्बास मरचन्द  (75), वासिम खान (43), इमरान बोट (27), शमीम बानो (67)

Web Title: Ten injured in accident at JJ junction