esakal | बांधकाम व्यावसायिक खूनप्रकरणी विरारमध्ये दहा संशयितांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बांधकाम व्यावसायिक खूनप्रकरणी विरारमध्ये दहा संशयितांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : विरार (Virar) पूर्व फुलपाडा- सहकारनगर परिसरात सोमवारी निशांत कदम या बांधकाम व्यावसायिकाचा( Businessmen) खून झाला होता. या प्रकरणात १४ संशयित आरोपींचा समावेश असून, विरार आणि गुन्हे प्रकटीकरण युनिटच्या पोलिसांनी ( Police) संयुक्त कारवाई करत गेल्या चार दिवसांत दहा आरोपींना अटक केली. इतर चार संशयित आरोपी फरार आहेत. त्यांची ओळख पटली आहे.

हेही वाचा: मुळेगाव परिसरात दारुच्या नशेत तरुणाचा खून ! संशयित आरोपी 12 तासांत जेरबंद

चंद्रकांत चौहान, रोशन तिवारी, अजय शिरसाठ, कैलाश शिरसाठ, प्रकाश राठोड, सब्बास सेख (वय ३१), अभय शिट्टी (२७), अजित सालवे (२७), अभिषेक राणा (३१), हामीद सेख (३९) अशी अटक दहा संशयितांची नावे आहेत. रविवारी रात्री दारूच्या पार्टीत कट रचून सोमवारी पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास निशांत कदमवर हल्ला करून सर्व फरारी झाले होते, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली

loading image
go to top