esakal | औरंगाबादचा वाद मातोश्रीवर मिटला, सत्तार आणि खैरे यांच्यात मनोमिलन..
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबादचा वाद मातोश्रीवर मिटला, सत्तार आणि खैरे यांच्यात मनोमिलन..

औरंगाबादचा वाद मातोश्रीवर मिटला, सत्तार आणि खैरे यांच्यात मनोमिलन..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसंस्था

मुंबई : औरंगाबाद मधला वाद शमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजेच वर्ष बंगल्यावर अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांची एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठक झाली. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे एकमेकांच्या हातात हात घालून बाहेर येताना पाहायला मिळाले. औरंगाबादमध्ये खैरे आणि सत्तार यांच्या कमालीचा वाद होता. एकमेकांविरोधात दोघांनी टोकाची वक्तव्य देखील केली होती. अशात आता मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर आता हा वाद शमलेला असल्याचं पाहायला मिळतंय.

धक्कादायक - काय झालंय विचारलं की 'तो' सांगायचा TB आहे, पण त्याला तर होता....

मातोश्रीवर तब्बल दीड तास ही बैठक सुरु होती. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. काल पर्यंत जे घडलं ते घडलं.. यापुढे पक्ष शिस्त आणि पक्षाच्या चौकटीत राहून काम करा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. दोघांनी उद्धव ठाकरे यांचा शब्द पाळणार असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर अब्दुल सत्तार यांनी एकमेकांना काही त्रास होईल असं करणार नसल्याचं सांगितल्याचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.   

मोठी बातमी -  भविष्यात मनसे देणार भाजपाला साथ ? बाळा नांदगावकर यांचं मोठं वक्तव्य..

राजीनामा ही केवळ अफवा होती. ही अफवा जोरात पसरल्याने विरोधकांनी यावर तोंडसुख घेतलं. मात्र तसं काही नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर या वादावर पडदा पडल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं  

अब्दुल सत्तार हे माझे मंत्री आहेत, येत्या काळात आम्ही पक्षाची शिस्त पाळू आणि एकत्रित काम करू असं चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांना सांगितलं. तर दोघांच्या गैरसमजुतीमुळे सर्व प्रकार झाल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. आता असा प्रकार पुन्हा होणार नाही. जो आदेश मातोश्रीवरून येईल तो तंतोतंत पळाला जाईल याची आम्ही दक्षता घेऊ असं देखील सत्तार म्हणालेत. 

मोठी बातमी - दिव्यात हलकल्लोळ... 350 हून अधिक घरे जमीनदोस्त..

tension between abdul sattar and chandrakant khaire is settled after meeting CM uddhav thackeray