
Mumbai-Ahemdabad Bullet Train
ESakal
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील दहावा स्टील पूल गुजरातमधील अहमदाबाद येथे यशस्वीरित्या उभारण्यात आला आहे. अहमदाबाद जिल्ह्यात उभारला गेलेला हा पहिलाच स्टील पूल असून, केवळ सात तासांत हे काम पूर्ण करण्यात आले. ६० मीटर लांबीचा हा पूल पश्चिम रेल्वेच्या सुविधांलगत उभारण्यात आला आहे.