तुर्भेतील जनता मार्केटमध्ये भीषण आग
तुर्भेतील जनता मार्केटमध्ये भीषण आग

तुर्भेतील जनता मार्केटमध्ये भीषण आग

नवी मुंबई : तुर्भे येथील जनता मार्केटमध्ये शनिवारी (ता.१७) भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये जनता मार्केटमधील चार गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जनता मार्केट परिसर नेहमी गजबजलेला असतो. मात्र, या ठिकाणी आग लागताच लोकांची एकच पळापळ सुरू झाली. स्थानिक दुकानमालकांनी नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र, आगीची तीव्रता वाढत गेल्याने अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ही आग पसरत गेल्याने यात चार दुकाने जळून खाक झाली. अग्निशमन दलाचा गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एपीएमसी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या आगीत दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com