परदेशात ट्रेनिंग घेतलेला दहशतवादी आरोपी इंदूरमधून अटकेत... महाराष्ट्र एटीएस इंदूरमध्ये दाखल

चीन, पाकिस्तान मध्ये ट्रेनिंग घेऊन आलेल्या संशियत दहशतवादी सरफराज मेमन याला इंदूरमध्ये अटक करण्यात आली
Terrorist accused trained abroad arrested from Indore Maharashtra ATS Indore
Terrorist accused trained abroad arrested from Indore Maharashtra ATS IndoreSakal

मुंबई : चीन, पाकिस्तान मध्ये ट्रेनिंग घेऊन आलेल्या संशियत दहशतवादी सरफराज मेमन याला इंदूरमध्ये अटक करण्यात आली आहे. एनआयएकडून दहशतवादी कारवायांविरोधात धोक्याचा इशारा देण्यात आला होता.

या प्रकरणी संशयित दहशतवादी सरफराज मेमनला इंदूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईत एका धोकादायक व्यक्तीचा वावर असल्याची माहिती एनआयएने मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना याबाबत माहिती पुरवली होती. एनआयएने दिलेल्या माहितीच्या आधारे इंदूर पोलिसांनी सरफराज मेमनला ताब्यात घेतलं आहे.

सरफराजच्या चौकशीसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेचे पथक इंदूरमध्ये दाखल झाली आहे. इंदुरहून आरोपी सरफराज मेमनला पुढील तपासातील एटीएस मुंबईत आणणार आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने पाठवलेल्या मेलमध्ये मुंबई पोलिसांसाठी एक अलर्ट जारी केला होता. त्यात एक धोकादायक व्यक्ती मुंबई शहरात पोहोचल्याचा इशारा देण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने ईमेलमध्ये सरफराज मेमन नामक व्यक्तीचा उल्लेख होता.

एनआयएने सरफराज हा देशासाठी अत्यंत धोकादायक व्यक्ती असल्याचे नमूद करत पोलिसांना अलर्ट राहण्याचे निर्देश दिले होते.

मध्य प्रदेशाचा आहे सरफराज

सरफराज मेमन मध्य प्रदेशाचा आहे. त्याने चीन व हाँगकाँगमध्ये ट्रेनिंग घेतली आहे. एनआयएने मुंबई पोलिसांना सरफराजचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग परवाना व पासपोर्टही मेल केला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी इंदूर पोलिसांशीही संपर्क साधला होता.एनआयएने त्याचे नाव कोणत्याही दहशतवादी संघटनेशी अद्याप जोडलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com