esakal | दहशतवादी जान महंमदला दिलं तिकीट, मुंबईतून तरुणाला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

police arrested

दहशतवादी जान महंमदला दिलं तिकीट, मुंबईतून तरुणाला अटक

sakal_logo
By
सुधीर काकडे

पोलिसांच्या विशेष विभागाने मंगळवारी दहशतवादी हल्ल्यांचा कट उधळून लावत सहा जणांना अटक केली. यामध्ये मुंबईच्या जान महंमद शेख ऊर्फ समीर कलिया (वय ४७) याचाही समावेश होता. जान महंमद शेख हा सायनमध्ये राहत होता. सोमवार सायंकाळपर्यंत तो मुंबईतच होत. जान महंमद शेखला मदत करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी अटक केली असून कसून चौकशी सुरु आहे. मुंबई पोलिसांनी जान मोहम्मदला रेल्वे तिकीट देणाऱ्या ट्रॅव्हल एजंटला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्या ट्रव्हल एजंटचं नाव अजगर असं आहे.

स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेने एकत्र कारवाई करत ट्रॅव्हल एजंट बेड्या ठोकल्या आहेत. सध्या अजगर याची कसून चौकशी सुरु आहे. अजगर आणि जान महमंद सायनमध्येच एकाच परिसरात राहतात. आधीपासूनच ते एकमेंकाना ओळखत असल्याचं तपासात उघड झालं आहे. अजगरने जान महमंद शेखसाठी13 सप्टेंबर रोजी मुंबई सेंट्रल ते दिल्ली असं ट्रेनचं तिकिट बूक केल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा: सायन: जान मोहम्मद शेखच्या कुटुंबाची मुंबई ATS कडून चौकशी

सहा राज्यात एकाच वेळी 15 स्फोट घडवून आणण्याचा इरादा या दहशतवाद्याचा होता. पण दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दहशतवाद्याचे मनसूबे उधळून लावले. त्यानंतर महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिस सतर्क झाले असून आणखी शोध घेत आहेत. मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांनी जान महंमद शेख याच्या कुटुंबियांची चौकशी केली. यावेळी अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. जान मोहम्मद सोमवार सायंकांळपर्यंत मुंबईतच होता. त्यानंतर त्यानं पत्नीला उत्तर प्रदेशला जातो म्हणून घर सोडलं. पत्नीला खात्री पटावी महणून मोबाइलमध्ये तिकिटही दाखवलं होतं. तसेच स्नॅपडील या कंपनीत आपण कामाला असल्याचे पत्नीला जान मंहमद याने सांगितलं होतं.

loading image
go to top