esakal | मेट्रो-३ ची मरोळ,मरोशी येथे चाचणी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मेट्रो-३ ची मरोळ,मरोशी येथे चाचणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कुलाबा-वांद्रे (Colaba-Bandra) सीप्झ या मेट्रो (Metro) ३ मार्गाच्या कारशेडचा पेच अद्याप सुटलेला नाही. हा पेच कायम असतानाच मेट्रो रेल्वे डब्यांची मरोळ, मरोशी येथे चाचणी करण्यात येणार आहे. 'अल्स्टॉम या कंपनीने श्रीसिटी आंध्रप्रदेश येथे ८ डब्यांची ट्रेन तयार केली असून, ती मुंबईत (Mumbai) लवकरच दाखल होणार आहे.

हेही वाचा: लोअर दूधना प्रकल्प धरणाचे चौदा दरवाजे उघडले; पाहा व्हिडिओ

ही ट्रेन दाखल होताच चाचण्यांना सुरुवात होणार आहे. मेट्रो-३ च्या कारशेडचा वाद सुरू असताना मेट्रो-३ प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रयत्न सुरू केले आहेत. अल्स्टॉम या कंपनीने तयार केलेल्या ८ डब्यांच्या ट्रेनची तांत्रिक चाचणी झाली आहे. प्रत्यक्षात या ट्रेनची मुंबईमध्ये १० हजार किलोमीटर चालवून चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर कुलाबा ते सीप्झ या मार्गिकेवर देखील ही ट्रेन चालविण्यात येणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अशा पद्धतीच्या ३१ ट्रेन या मार्गावर उपलब्ध होणार आहेत. आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता चाचण्या पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

loading image
go to top