Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. यानंतर आता पुन्हा ठाकरे बंधूंसह इतर पक्षाचे नेते निवडणूक आयोगाच्या भेटीला जाणार आहेत. मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील. अजित नवले, प्रकाश रेड्डी यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली. पण आज पुन्हा काही नेते निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. यावेळी शरद पवार हे मात्र बैठकीला उपस्थित नसतील.