

Corruption Row Sparks As Thackeray Brothers Corner Devendra Fadnavis
Esakal
ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत अनेक मुद्द्यांवरून भाजपला टार्गेट केलं. यात मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोपही दोघांनी केला. तसंच विकासाची भाषा करणारा भाजप भ्रष्टाचारी झाल्याची टीकाही करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी भाजप आता राष्ट्र प्रथम म्हणणारी नव्हे तर भ्रष्टाचार प्रथम म्हणणारी झाल्याचं म्हटलं. दुसरीकडे राज ठाकरे यांनी थेट फडणवीसांचे नाव घेत अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांवरून निशाणा साधला. अजित पवारांविरोधात दिलेले पुरावे आता कोर्टात द्या असं राज ठाकरे म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांनी आता फडणवीसांनी अजित पवारांना हाकलावं नाहीतर माफी मागावी असं म्हणत घणाघाती टीका केली.