

Mumbai Politics Thackeray Brothers Share Stage During Student Protest Ahead of BMC Elections New Political Signals
sakal
-विनोद राऊत
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव व राज हे ठाकरे बंधू एकत्र आले; मात्र सत्ता मिळवता आली नाही. निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याने दोन भावांची युती किती दिवस टिकेल, अशी चर्चा सुरू होती; मात्र दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने ठाकरे बंधूंची पुन्हा एकजूट झाली. एवढेच नव्हे तर विरोधकांची पोकळी भरून काढण्यात ठाकरे बंधू यशस्वी झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.