esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर अडचण नाही, ठाकरे सरकार पडणार नाही; कसं ? वाचा महत्त्वाची बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर अडचण नाही, ठाकरे सरकार पडणार नाही; कसं ? वाचा महत्त्वाची बातमी

विधानसभेतील आमदारांनी विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागा येत्या २४ एप्रिल रोजी रिक्त होत आहेत. त्या जागांसाठी दोन आठवडयांच्या पूर्वसुचनेनुसार निवडणुका घेणे शक्य असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ मे पर्यंत आमदार होण्यात अडचण नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर अडचण नाही, ठाकरे सरकार पडणार नाही; कसं ? वाचा महत्त्वाची बातमी

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : विधानसभेतील आमदारांनी विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागा येत्या २४ एप्रिल रोजी रिक्त होत आहेत. त्या जागांसाठी दोन आठवडयांच्या पूर्वसुचनेनुसार निवडणुका घेणे शक्य असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ मे पर्यंत आमदार होण्यात अडचण नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे सदस्यत्व स्वीकारायचे ठरवले तर एखाद्या आमदाराला राजीनामा देत जागा रिक्त करावी लागेल. मग त्या रिक्त जागेवर ठाकरेंनी लढायचे ठरले तर आयोगाला निवडणूक घोषित करावी लागेल. त्यासाठी ४५ दिवसांचा अवधी आवश्यक असतो. मात्र परिषद निवडणुकीचे तसे नाही. रिक्त होणार्या जागांसाठी आयोगाला १५ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे हे सांगणारे नियम आहेत.

त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातला लॉकडाऊन १४ एप्रिलनंतर आरोग्यमंत्र्यांच्या आजच्या विधानानुसार अगदी ३० एप्रिलपर्यंत वाढला तरी त्यानंतर पंधरा दिवसांच्या कालावधीत निवडणूक होवू शकेल. रिक्त होणार्या नउ जागांपैकी २ शिवसेनासदस्य आहेत. आमदारांनी निवडून देण्याची निवडणूक आकडेवारीच्या निकषावर शिवसेनेला फारशी कठीण नसल्याने आमदार होणे ठाकरेंसाठी कठीण नाही. 

महत्त्वाच्या बातम्या : 

thackeray government will not collapse read full story about various probabilities