

डोंबिवली : विधानसभा निवडणूकीचे निकाल लागले आहेत. काही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्यांची अपेक्षा असताना हवा तसा लिड त्यांना मिळालेला नाही. राज्यात महायुतीचा एकतर्फी विजय झाला असून यामागे ईव्हीएम मशीन मधील फेरफार कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. ईव्हीएम मशीन विरोधात ठाकरे गटाकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असून याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक स्वतःहून आपली स्वाक्षरी करून आपले मत मांडत असल्याचे डोंबिवली विधानसभा मतदारसंघात दिसुन आले.