
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील पलावा पुलाचे घाईघाईत उद्घाटन झाले. पूल सुरू होताच काही वाहन चालक घसरून पडले. पुलाचे काम पूर्ण झाले नसताना पूल सुरू केल्याने वाहन चालकांचा अपघात झाला. पुलाचे उद्घाटन करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. तसेच पुलाचे उद्घाटन सत्ताधारी पक्षातील केवळ एक पक्ष करतो, जवळच प्रदेशाध्यक्ष राहतात त्यांनाही बोलावलं नाही. मग महायुती मध्ये युती राहिली कोठे असा टोला म्हात्रे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.