
डोंबिवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला डोंबिवलीत गळती लागली आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून कल्याण लोकसभेचे युवासेना जिल्हाधिकारी प्रतिक पाटील यांनी राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. शिवसेनेचे नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्रव्यवहार करत पाटील यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.