

Vinayak Raut Case
ESakal
ठाणे : शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे कुटुंबीय आणि एका भोंदूबाबाविरुद्ध सुनेने गंभीर आरोप करीत कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विवाहापूर्वी खोटी माहिती देऊन फसवणूक, विवाहानंतर मानसिक व शारीरिक छळ तसेच अंधश्रद्धेच्या नावाखाली अघोरी उपचार करण्यास भाग पाडल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी फिरोज शेखला अटक केली आहे.