ठाणेः परराज्यातून रेल्वेनं दाखल झालेले तब्बल 448 प्रवासी कोरोनाबाधित

ठाणेः परराज्यातून रेल्वेनं दाखल झालेले तब्बल 448 प्रवासी कोरोनाबाधित

मुंबईः ठाणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पालिका आरोग्य कर्मचारी दिवसरात्र झटत आहे. महापालिकेच्यावतीने शहरात चाचण्याचे प्रमाण देखील वाढवले आहे. अशातच परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या नागरिकांवर देखरेख करण्यासाठी आणि त्यांची त्याच ठिकाणी चाचणी करण्याच्या दृष्टीने महापालिकेने दिवसा आणि रात्रीची कोरोना चाचणी सुरु केली आहे. या चाचण्यांमधून रेल्वेने परराज्यातून आलेल्या प्रवाशांपैकी 448 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे शहरातील विविध बस्थानकांवर सरकारी आणि खासगी बसेसने दाखल होणाऱ्या प्रवाशांची अॅटेजिन टेस्ट केली जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे एसटीमधून किती कोरोना रुग्ण ठाण्यात आले, याची माहिती पालिकेच्या दप्तरी उपलब्ध नाही.

ठाणे शहरात मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून ज्या प्रभागात, विभागात, गल्लीमध्ये रुग्ण आढळून येत आहे. त्या ठिकाणी संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करणे, धूर फवारणी करणे आदी उपाययोजना महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यात एप्रिल ते सप्टेंबर या काळात आढळून येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत ऑक्टोबरपासून घट होत असल्याचे दिसत आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात पालिका प्रशासनाला यश आले. 

टाळेबंदी शिथिल आल्यानंतर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता, परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या नागरिकांवर देखरेख करण्यासाठी आणि त्यांची त्याच ठिकाणी चाचणी करण्याच्या दृष्टीने महापालिकेने 30 ऑगस्टपासून दिवसाची आणि 5 नोव्हेंबरपासून रात्रीची कोरोना चाचणी केंद्रे रेल्वे स्टेशन परिसरात सुरु केली. त्यानुसार आतापर्यंत ठाण्यात रेल्वेनं परराज्यातून 448 कोरोना रुग्ण आलेत. त्यामुळे कोरोनाला अटकाव करण्यात पालिकेने काहीसे यश मिळविले आहे.

दिवसाच्या सत्रात 30 ऑगस्टपासून आतापर्यंत 89 हजार 54 जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यातील 386 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे तर, 5 नोव्हेंबरपासून आतापर्यंत रात्रीच्या सत्रात सुरु करण्यात आलेल्या 10 हजार 902 जणांच्या चाचणीत 62 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे.  त्यानुसार आता या दोन्ही सत्रात करण्यात आलेल्या 99 हजार 956 चाचण्यांमध्ये 448 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान ठाणे शहरात राज्यातील विविध भागातून एसटी आणि खासगी बसेसमधून देखील मोठ्या प्रमाणात प्रवासी रोजच्या रोज येत आहेत. त्यात ठाणे स्टेशन, वंदना एसटी डेपो आणि खोपट डेपो येथून रोज शेकडो प्रवासी ये जा करताहेत. मात्र बाहेरून येणाऱ्या एकाही प्रवाशाची कोरोना चाचणी किंवा अँटेजिन टेस्ट केली जात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे एसटीमधून किती कोरोना रुग्ण ठाण्यात आले, याची माहिती पालिकेच्या दप्तरी उपलब्ध नाही. एकीकडे रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यामातून कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना केल्या जात असताना, दुसरीकडे एसटी आणि खासगी बसेसने येणाऱ्या प्रवाशांकडे मात्र लक्षच दिले जात नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

 ठाणे शहरातील विविध भागात चाचण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. तसेच एसटी आणि खासगी बसेसेने शहरत दाखळ होणाऱ्या प्रवाशांच्या देखील चाचण्या करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून यासंदर्भात सकारात्मक निर्णय लवकरच घेऊ. 
संदिप माळवी, उपायुक्त, ठामपा.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Thane 448 passengers arriving by train from foreign states corona positive

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com