वसई तहसीलदार कार्यालयावर ठाणे एसीबीचा छापा, 7 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं

ACB Action On Vasai Tehsildar Office: ठाणे एसीबीने वसई तहसीलदार कार्यालयावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये एका इसमाला एसीबीने 7 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं आहे.
ACB Raid on  Vasai Tehsildar Office

ACB Raid on Vasai Tehsildar Office

ESakal

Updated on

विरार : भ्रष्टाचाराचे आगर असलेलं वसई तहसीलदार व त्यांचा अकृषिक विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला असून यांत वसईचे अप्पर तहसीलदार (अकृषीक ) विनोद बाळकृष्ण धोत्रे यांच्या कार्यालयातील खाजगी इसम अनिल प्रभाकर चौबल यांस अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी पीडित तक्रारदारांकडून तब्बल रु. 7 लाख रुपयांची लाच स्वीकारतानां ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल संद्याकाळी सापळा रचून रंगेहात पकडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com