

Air Pollution
ESakal
दत्तात्रय बाठे
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात हवा प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढत असून, येथील हवेचा दर्जा (एक्यूआय) ‘अस्वास्थ्यकर’ श्रेणीत पोहोचला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, श्वसनाचे आजार बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ प्रभावी उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता पर्यावरण जाणकारांकडून वर्तवली जात आहे.