ठाणे अन् कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच; दिवसभरात जिल्ह्यात तब्बल 'इतके' जण बाधित

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 11 July 2020

ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली आणि ठाणे पालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे शनिवारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली आणि ठाणे पालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे शनिवारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शनिवारी केडीएमसी हद्दीत 615 नवीन रुग्णांसह 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ ठाणे पालिका हद्दीत 456 बाधितांसह, 17 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मागील 24 तासात जिल्ह्यात दोन हजार 232 नवीन बाधित रुग्णांची तर, 53 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 53 हजार 152 तर, मृतांची संख्या 1 हजार 560 झाली आहे. 

नक्की वाचाकोरोना नियंत्रणासाठी पालिकेचा नवा फॉर्म्युला; उपनगरातील 6 प्रभागात लागू...

नवी मुंबई महापालिकेत 253 रुग्णांची तर, 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 9 हजार 132 तर, मृतांची संख्या 292 वर पोहोचला आहे. मीरा भाईंदरमध्ये 243 नवे रुग्ण, भिवंडी महापालिका क्षेत्रात 61, उल्हासनगर 295, अंबरनाथ 99, बदलापूर 76 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, ठाणे ग्रामीण भागात 134 रुग्णांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 2 हजार 953 तर, मृतांची संख्या 82 वर गेली आहे.

हे ही वाचाकल्याणमध्ये कोरोना पसरण्याचा धोका; कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.... ​

महापालिका क्षेत्र   -   रुग्ण संख्या   -   मृत

  • ठाणे   -   456   -   17
  • कल्याण डोंबिवली   -   615   -   09
  • नवी मुंबई   -   253   -   08
  • मीरा भाईंदर   -   243   -   04
  • भिवंडी   -   61   -   03
  • उल्हासनगर   -   295   -   01
  • अंबरनाथ   -   99   -   07
  • बदलापूर   -   76   -   00
  • ठाणे ग्रामीण   -   134   -   04

(संपादन : वैभव गाटे)

in thane and kalyan corona positives are increse day by day read detail story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in thane and kalyan corona positives are increase day by day read detail story