कोरोना नियंत्रणासाठी पालिकेचा नवा फॉर्म्युला; उपनगरातील 6 प्रभागात लागू...

समीर सुर्वे
Saturday, 11 July 2020

एप्रिल आणि मे महिन्यांच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत एका रुग्णांमागे 3 जणांचे विलगीकरण असे सूत्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर 6 जणांचे विलगीकरणााााचे सूत्र तयार करण्यात आले. याकाळात धारावी, देवनार, वांद्रे पूर्व या भागात एका रुग्णांमागे 10 जणांचे विलगीकरण करण्याचे सूत्र ठरविण्यात आले.

मुंबई: मुंबई शहरासह कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. एखाद्या परिसरात किंवा इमारतीत कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील हायरिस्क आणि लोरिस्क कॉन्टक्टमधील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याबाबतही पालिकेने विविध उपाययोजना राबवल्या.  उपनगरांमधील 6 प्रभागातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी एका रुग्णामागे 20 जणांना क्वारंटाईन करण्यात निर्णय पालिकेने घेतला आहे. सुरवातीच्या काळात फक्त 3 जणांचे विलगीकरण केले जात होते.

शाब्बास! धारावीतील संसर्ग नियंत्रणात आणल्यामुळे WHO कडून कौतुकाची थाप

एप्रिल आणि मे महिन्यांच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत एका रुग्णांमागे 3 जणांचे विलगीकरण असे सूत्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर 6 जणांचे विलगीकरणााााचे सूत्र तयार करण्यात आले. याकाळात धारावी, देवनार, वांद्रे पूर्व या भागात एका रुग्णांमागे 10 जणांचे विलगीकरण करण्याचे सूत्र ठरविण्यात आले. त्याचे चांगले परीणामही दिसू लागले. हायरिस्क व्यक्तींचे विलगीकरण  केल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्यास त्यांच्यापासून संसर्ग पसरत नाही, त्याचबरोबर त्यांच्यावर उपचारही तत्काळ सुरु करण्यात येतात.

'क्रिश 4'मध्ये हृतीकबरोबर झळकणार 'हा' मोठा कलाकार..?​

मुंबईतील मालाड, बोरीवली, कांदिवली, दहिसर, भांडूप, मुलूंड या भागात एक रुग्ण आढळल्यास 20 जणांचे विलगीकरण करण्याचे सूत्र ठरविण्यात आले आहे. खासकरुन दाट लोकवस्त्या, चाळींमध्ये हे सूत्र वापरले जात आहे. यात सरसकट 20 जणांना पालिकेच्या केंद्रात आणले जाते असे नाही. तर रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींना केंद्रांमध्ये क्वारंटाईन केले जाते. तर इतरांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो.

मनसेचे पुन्हा खळखट्याक;  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून संताप...​

याचे आता चांगले परीणामही दिसू लागले आहेत. या भागातील कोरोना रुग्णवाढीचा दरही 3 टक्क्या पेक्षा कमी झाला आहे. बोरीवलीत सध्या सर्वाधिक 2.7, मुलूंडमध्ये 2.6, कांदिवलीत 2.4, दहिसर 2.3, मालाड 1.8 आणि भांडूप 1.5 टक्के दराने रुग्णवाढ होत आहे. तर मुंबईतील रुग्णवाढीचा दर 1.39 टक्क्यांवर आला आहे.
--
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bmc to set new formula to break the chain of corona in new hotspot