ठाणे-बेलापूर प्रवास आता सुसाट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नवी मुंबई - ठाणे-बेलापूर मार्गावर एमएमआरडीएने उभारलेल्या दोन उड्डाणपूल व एका भुयारी मार्गामुळे  हा मार्ग प्रवासासाठी आता वेगवान ठरणार आहे. कायमच्या वाहतूक कोंडीमुळे तुर्भे अथवा वाशीहून कळव्याला पोहोचण्यासाठी सव्वा ते दीड तासाचा कालावधी लागत होता. मात्र आता ठाण्याला जाताना तुर्भे सोडल्यानंतर प्रवाशांना अवघ्या १५ मिनिटांत कळवा गाठणे शक्‍य होणार आहे. वाहतूक कोंडीतील वेळ वाचणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले.  

ठाणे-बेलापूर मार्गावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत होती. त्यामुळे या मार्गावर पालिकेने उड्डाणपूल व भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे दिला. त्यानुसार या मार्गावर २०१४ पासून काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्‍याने समाधान व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे.

वेळेची बचत
या मार्गावर दोन मार्गिका असणारा ५७५ मीटर लांबीचा सविता केमिकल्सजवळील उड्डाणपूल, चार मार्गिका असणारा घणसोली- तळवलीजवळील दीड किलोमीटरचा उड्डाणपूल व महापेजवळ ४८५ मीटर लांबीचा तीन मार्गिका असणारा भुयारी मार्ग उभारण्यात आला आहे. या रस्त्यांवर आधीच असलेल्या कोपरखैरणे व ऐरोली उड्डाणपुलांमध्ये आणखी दोन उड्डाणपूल व एका भुयारी मार्गाची भर पडल्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास तुर्भे सोडल्यानंतर आता १५ ते २० मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.

Web Title: thane belapur road overbridge