BSP Party : ठाणे, भिवंडी व कल्याण लोकसभा मतदार संघात बसपा स्वबळावर लढणार

बहुजन समाज पार्टीने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
Kalpana Kiratkar
Kalpana Kiratkarsakal

डोंबिवली - बहुजन समाज पार्टीने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभेचा यात समावेश असून बसपा कडून उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती बसपाच्या ठाणे जिल्हा प्रभारी कल्पना किरतकर यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी घेतला आहे. राज्यभरात 48 जागांवर बसपाने उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती किरतकर यांनी दिली.

यामध्ये कल्याण, ठाणे व भिवंडी लोकसभेच्या जागेचा समावेश आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बसपा आणि समाजवादी पार्टी यांनी एकत्रपणे निवडणूक लढविली होती. कल्याण लोकसभेत बसपाचे निवडणुकीत दयानंद किरतकर यांनी निवडणूक लढविली होती.

2024 ची लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून बसपा ठाणे जिल्हा प्रभारी कल्पना किरतकर म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत बसपाने महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. यात ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा मतदार संघाचाही समावेश असणार आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने आमची तयारी सुरू झाली आहे. उमेदवारांची चाचपणी केली जात असून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल असे किरतकर यांनी सांगितले. यावेळी ठाणे लोकसभा प्रभारी मधुकर बनसोडे, डोंबिवली विधानसभा अध्यक्ष रवी बनसोडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com